संचारबंदीत विक्री करणार्यांचे धाबे दणाणले
संचारबंदी लागू असताना नियम मोडून रस्त्यावर भाजीपाला व किराणा साहित्य विकणार्या 8 विक्रेत्यांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद रेहान सय्यद मुश्ताक वय-20 (रा.कोतवालपुरा,गरमपाणी),किरण संपत साळवे वय-27 (रा.सातारापरिसर),गणेश दिलीपचंद्र राठोर वय-35 (रा.राजीवनगर), अंकुश त्रंबक वाढेकर वय-42 ( रा.हमालवाडा), राहुल भाऊसाहेब घुले वय-32 (रा.हमालवाडा), शेख बरकत शेख बब्बू वय-19(रा.सिटीचौक), शाहरुख बबन पटेल (रा.चिष्टीयाकॉलोनी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेली विक्रेत्यांचे नाव आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरात कडक स्वरूपाची संचारबंदी लावण्यात आली आहे. या मध्ये वैधकीय व दुध वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले आहे. तरी देखील काही विक्रेते भाजीपाला दुकाने व किराणा दुकान सुरू ठेवतात अशा विक्रेत्या विरोधात शहर पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.त्यामुळे आदेश धुडकवत संचारबंदीच्या काळात विक्री करणार्याचे धाबे दणाणले आहे.














